HW News Marathi
देश / विदेश

नागालँडमधील बंडखोरांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

नागालॅंड | मोन जिल्ह्यात नागालँडमधील बंडखोरांच्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-के) NSCN-K च्या बंडखोरांनी हा हल्ला केला आहे. हा हल्ला बीआरओ कॅम्पजवळ केला होता.

 

या बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात हवालदार फतेह सिंह नेगी आणि शिपाई एच. कोनयाक हे दोन जवान शहीद झाले असल्याची माहिती आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बंडखोर आणि जवान यांच्यात जवळपास एक तास चकमक सुरू होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लष्कराच्या कारवाईत काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

News Desk

एअर इंडियाचे कर्मचारी भूताला घाबरले

News Desk

बकवास करणाऱ्या इसिसवर नजर ठेवावीच लागेल !

News Desk
देश / विदेश

धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

News Desk

बंगळुरु | पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्रातून परशुराम वाघमारे याला अटक करण्यात आली आहे. धर्माच्या रक्षणासाठी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिली असल्याचा दावा कर्नाटकच्याय एसआयटीने केला आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम यांनी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली दिली आहे. लंकेश यांच्या हत्येसाठी तीन जणांची मदत घेण्यात आली असल्याचे देखील परशुरामने सांगितले. या तीन जणांचा शोध कर्नाटकची एसआयटी घेत आहे.

लंकेश यांची हत्या करण्यासाठी बेळगावात ट्रेनिंग घेऊन हत्या करण्यासाठी एअरगनचा वापर केला असल्याचे देखील परशुराने सांगितले. लंकेश यांच्या हत्या करण्यासाठी परशुरामला कुठल्या संघटनेने किंवा संस्थेने सांगितले होते? त्यांच्या हत्ये मागे कुणाचा हात आहे? याबाबत कर्नाटकच्या एसआयटीने अद्याप कोणतीच माहिती दिली नाही.

 

Related posts

छत्तीसगढमध्ये ८ नक्षलवाद्यांना अटक

News Desk

ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्यासाठी मिळाला दिलासा

News Desk

भारतीय वायु सेनेने ‘या’ दहशतवाद्यांचा केला खात्मा

News Desk