HW Marathi
देश / विदेश

काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात भारतीय लष्कराने आज (६ एप्रिल) दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या परिसरात काही दहशतवादी लपूरन बसलेची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर या भागात शोध मोहीम राबविण्यात आली होती. यानंतर दहशतवादी आणि लष्कर यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले.

या आठवड्यात पुलवामामध्ये चकमकीत भारतीय लष्करात चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल होते. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक स्थानिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना खात्मा करण्यात लष्करांना यश आले

 

Related posts

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar

मोदीजी…..आज जुमलों की बारीश, राहुल गांधीचा मोदींना चिमटा

News Desk

खेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध

News Desk