HW News Marathi
देश / विदेश

बँक लुटण्यासाठी खोदला दोन हजार फूट लांबीचा बोगदा

साओ पाउलो(वृत्तसंस्था): चोरी करण्यासाठी चोरटे कुठल्याही थराला जावून काहीही शक्कल लावू शकतात. याचा प्रत्यय ब्राझीलमध्ये आला. बँकेत चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तब्बल दोन हजार फूट लांबीचा बोगदा खोदला. १६ चोरटे रात्रंदिवस बोगदा खोदण्याचे काम करत होते. खोदकाम करण्यासाठी सर्व अत्याधुनिक साहित्याचा वापर करण्यात आला.

प्रथमदर्शनी हा प्रकार चोरीसाठी नसून महापालिकेचे कर्मचारी पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करत असावेत, असे वाटत आहे. परंतु तसे काहीही नव्हते. या चोरट्यांनी परिसरातील सर्वात मोठी बँक फोडण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खोल बोगदा तयार केला. चार महिने बोगदा खोदून बँकेच्या दारापर्यंत खड्डा पोहोचता त्यांच्या चोरीचा भंडाफोड झाला. पोलिसांनी सर्व सोळा आरोपींना अटक केली आहे. त्यांना बँकेतील ३१४ मिलियन डॉलर चोरण्याचा मनसुबा होता. परंतु त्यात त्यांना अपयश आले. परंतु चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली नामी पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती रामनाथ कोविंदही करणार कोरोनाची चाचणी

swarit

नमाज चालतो, जन्माष्टमी का नाही? – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

News Desk

चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले जाणार नाही

News Desk