लंडन | ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयातूनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. बोरिस यांना २७ मार्चला कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनाची लागण झाल्याची कळाल्यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. जॉनसन यांना लंडनमधील सेंट थॉमस रूग्णालयात दाखल करण्यात येत आले होते. यानंतर बोरिस यांना ७ एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
UK Prime Minister Boris Johnson discharged from hospital reports AFP quoting Downing Street (File pic) pic.twitter.com/dVng9V6zys
— ANI (@ANI) April 12, 2020
दरम्यान बोरिस यांना १० एप्रिल रोजी अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असून त्यांची प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे. बोरिस यांना डॉक्टरांच्या देखरेखीतमध्ये ठेवले आहे. यानंतर आज (१२ एप्रिल) बोरिस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती इंग्लंडच्या एएफपी डाउनिंग स्ट्रीटच्या माध्यमातूनही माहिती मिळलाी आहे. बोरिस यांना रुग्णलयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरीच राहण्याचा डॉक्टरांनी सांगितले आहे.
जॉनसन यांना लंडनमधील सेंट थॉमस रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून ब्रिटनचे विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी तात्पुरत्या स्वरुपात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. यापूर्वीच राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.