HW News Marathi
देश / विदेश

अखेर जीवघेणा ‘ब्ल्यू व्हेल’ नष्ट!

नवी दिल्ली – जीवघेणा ‘ब्ल्यू व्हेल’ हा गेम डाऊनलोड करण्याच्या सर्व लिंक्स कायमस्वरूपी नष्ट करण्याचे आदेश गुगल, याहू या सर्च इंजिनना, तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया अॅप्सला केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे अनेक तरुणांच्या जीवावर उठलेल्या या गेमचा भारतातून बाजार उठला आहे. विशेष म्हणजे या गेमवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

या गेममधील आव्हाने स्वीकारीत मुलांनी उंचावरून उड्या मारून आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांत देशभरात घडल्या होत्या. त्यामुळे सतर्क होत, केंद्राने याबाबत तातडीने पावले उचलली. महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश या राज्यांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. तसेच केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला या गेमवर बंदी आणण्याबाबतचे पत्रही लिहिले होते.

माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया साइट्सला हा गेम हटवण्याचे आदेशही दिले होते. पण या गेमवर बंदी येण्याआधीच सोशल मीडियावर गेमची हुबेहुब लिंक्स तयार करून त्या व्हायरल केल्या गेल्या. हे लक्षात घेता केंद्राने आज ब्लू व्हेल गेमसह त्याच्याशी मिळत्या जुळत्या इतर सर्व गेमच्या लिंक्स नष्ट करून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एटीएम झाले जप्त,पहा…कसलं होतं एटीएम

News Desk

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित व्यवस्थापन मंडळास सहकारी बँकांच्या संघटनांचा तीव्र विरोध

Gauri Tilekar

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

News Desk