नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले.
२९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे. या वर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –
वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येणार
वीज वितरण क्षेत्रासाठी ३,०५,९८४ कोटींच्या तरतुदीसह नव्या योजनेला सुरुवात
आता २०२१-२२ साठी एक हायड्रोजन एनर्जी मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव
ग्रीन पॉवरच्या माध्यमातून हायड्रोजनची निर्मिती करणार
सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद
यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद
उज्ज्वाल गॅस योजनेचा विस्तार केला जाणार आहे.
या प्रस्तावाअंतर्गंत उज्ज्वला गॅस योजनेचा फायदा आणखी 1 कोटी लोकांना देण्यात येईल
उज्वला गॅसला आणखी एक कोटी लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल
गॅस पाईपलाईन प्रोजेक्टला जम्मू-काश्मीरपर्यंत घेऊन जाऊ
Ujjwala scheme will be expanded to over 1 crore more beneficiaries. We will add 100 more districts in the next three years to the city gas distribution network. A gas pipeline project will be taken up in Jammu and Kashmir: Finance Minister Nirmala Sitharaman. #UnionBudget2021 pic.twitter.com/umvrgtAk5h
— ANI (@ANI) February 1, 2021
In 2021-22 we would also bring the IPO of LIC for which I am bringing the requisite amendments in this session itself: Finance Minister Nirmala Sitharaman #UnionBudget pic.twitter.com/NifUTtlCku
— ANI (@ANI) February 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.