नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने ‘आर्थिक लस’ देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येईल.
देशाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य व्यक्तीपासून ते उद्योगपतींना मोठ्या अपेक्षा असतात. प्रत्येक क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून काही मदतीच्या अपेक्षा असतात. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आज विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात येतील. त्यानिमित्ताने सरकारच्या तिजोरीत उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने येते आणि ते उत्पन्न नंतर कोणत्या गोष्टींवर खर्च केले जाते याचं गणित मांडण्यात येईल.
निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –
आपत्कालीन निधीत मोठी वाढ, ३० हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारने आपत्कालीन निधीत भरीव वाढ केली आहे.
केंद्राने आपत्कालीन निधी ५०० कोटींवरून ३० हजार कोटींपर्यंत वाढवला आहे.
२०२० मध्ये ६.४ कोटी नागरिकांना आयकर भरला
जेष्ठ नागरिकांना आयकरामध्ये सूट देण्यात येणार आहे.
छोट्या करदात्यांवरील भार कमी करण्यात येणार.
२०२० मध्ये GDP ९.५ % होता, आर्थिक वर्ष २०२१-२२
दरम्यान GDP राजकोषीय तूट ६.५% राहण्याची शक्यता आहे,
यासाठी सरकारला ८० कोटी रुपयांची गरज असेल, जे पुढीलल दोन महिन्यात मार्केटमधून घेतलं जाईल
पेन्शनधारकांवरील कर माफ करण्याचा निर्णय
७५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्यां करमाफीची घोषणा निर्मला सीतरामन यांनी केली.
पेन्शननं कमाई असलेल्यांसाठी कर भरावा लागणार नाही.
७५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना करमुक्ती
२०२० मध्ये एकूण ६.४८ नागरिकांनी आयकर भरला. ७५वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ट नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे.
तसेच पेन्शन आणि व्याजाच्या माध्यमातून आलेल्या मिळकतीवर वरिष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही
७५ वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे, त्यांना आयकरातून सूट देण्याचा प्रस्ताव
छोट्या करदात्यांसाठी Dispute Resoln केले जाईल
३ वर्षांपेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या वादांचे खटलेही उघडले जाणार नाहीत.
अनिवासी भारतीयांना कर भरण्यात अडचण होती, परंतु आता त्यांना डबल टॅक्स सिस्टममधून सूट देण्यात आली आहे.
PF उशिरा जमा करण्यावर कुठलंही डिडक्शन नाही
छोट्या करदात्यांसाठी Dispute Resoln बनवले जातील
REIT, INVIT साठी डिव्हिडेंड TDS मधून बाहेर असेल
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.