मुंबई | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी कौतुक केले आहे. देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी आपण मनमोहन सिंग यांचे कायम ऋणी राहिले पाहिजे, असे म्हणत गडकरींनी सांगितले आहे. गडकरी हे टॅक्स इंडिया ऑनलाइन (Tax India Online) पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी मनमोहन सिंग यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
नितीन गडकरी म्हणाले, “देशाला उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे नवीन दिशा मिळाली असून यासाठी आपण सर्वांच मनमोहन सिंग यांचा ऋणी आहोत,” असे त्यांनी बोलताना म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळेच आपण 1990 सालादरम्यान महाराष्ट्रात रस्ते निर्माण करण्याचा निधी उभारू शकलो, असे त्यांनी सांगितले. उदारमतवाद आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असल्याचे गडकरींनी म्हणाले. गडकरींनी टॅक्स इंडिया ऑनलाइन या पोर्टलने दिलेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हणाले.
यावेळी गडकरींनी राष्ट्रीय महामार्ग उभारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सर्व सामान्यांकडून पैसा गोळा करत असून आपले मंत्रालय 36 हरित राष्ट्रीय महामार्ग उभे करण्यात आले आहे. यासाठी निधी कमी पडत नसल्याची माहिती त्यांनी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.