HW News Marathi
देश / विदेश

“कोकण बुडत असताना नेत्यांच्या मात्र पार्ट्या…”, ईद पार्टीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली | राज्यात पावसाची अतिवृष्टी झाली आहे. कालपासून पावसाने हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आङेत.कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका चिपळूणला बसला असून त्याचबरोबर रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले आहे.

तसेच, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि काही भागांत रस्ते पाण्याखाली गेल्याने दोन्ही प्रकारची वाहतूक ठप्प झाल्याचं पहायला मिळालं. एकीकडे कोकणवर आस्मानी संकट आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांनी पोस्ट केलेल्या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे महाराष्ट्राला पावसाने झोडपलं असताना दुसरीकडे मात्र नेत्यांच्या पार्ट्या सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष असणाऱ्या फौजीया खान यांनी ईदनिमित्त आपल्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल (२२ जुलै) फौजीया यांनी ट्विट केला आहे.

दरम्यान या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरुन वाद सुरु असला तरी दुसरीकडे आजही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आणखी तीन ते चार दिवस मुसळधारांचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांत २३ जुलैला मुसळधार आणि त्यानंतर तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात बोईंग ७३७ मॅक्स-८ विमान वापरावर बंदी

News Desk

“…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट”, जयंत पाटीलांनी सांगितलं भेटीचं कारण!

News Desk

संजय राऊत-आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा ! भाजप नेत्याची सीबीआयकडे मागणी

News Desk