नवी दिल्ली | पाकिस्तान सतत दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे थांबविले नाही. तर पाकिस्तानला जाणारे पाणी रोखल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला आहे. भारताचे १९६० मधील तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानच्या जनरल अयूब खान यांच्यामध्ये उभय देशांसाठी पाणीवाटप करार झाला होता. या करारानुसार दोन्ही उभय देशांमध्ये बंधुत्व, सौहार्द आणि कौटुंबिक नाते असल्याने आम्ही भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देत आहोत असे नमूद करण्यात आले होते.
Union Minister Nitin Gadkari: Pakistan is continuously supporting terrorists. If Pakistan doesn't stops terrorism, we won't have any other option but to stop river water to Pakistan. So India has started internally studying it. That water will go to Haryana, Punjab & Rajasthan pic.twitter.com/C6N63auZKu
— ANI (@ANI) May 9, 2019
गडकरी पंजाबमध्ये प्रचारासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पाकिस्ताने दहशतवादी कारवायाला आळा घातला नाही तर, पाकिस्तानला जाणारे पाणी नाईलाजाने रोखावे लागेल, असा धमकी वजा इशारा दिली आहे. पाकिस्तानला जाणार पाणी वळवून पंजाब, हरियाणा आणि राजस्थानला दिले जाईल, असे गडकरी म्हणाले. कर्तारपूर कॉरिडॉरचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जमीन अधिग्रहण करताना अडचणींना सामोरे जावे लागले, पण पंजाब सरकारच्या मदतीने त्यावर तोडगा काढला जाईल असे गडकरी यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.