HW News Marathi
देश / विदेश

अखेर उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

नवी दिल्ली | अखेर उन्नाव बलात्कार आणि अपहरण प्रकरणी भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर दोषी असल्याचा निर्णय दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी महिला आरोपी शशी सिंह हिला देखील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. चार्जशीट उशीरा दाखल केल्याने न्यायालयाने सीबीआयला फटकारले. या प्रकरणी न्यायालयकडून १९ डिसेंबरला सेंगरच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे.

उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार करण्यात आला होता. यात भाजपचे आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर या बलात्काराचा व अपहरणाचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हैदराबाद सामूहिक बलात्कारात चार आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीत २०१२ मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हदरून गेला होता. मात्र, सात वर्ष उलटूनही निर्भया न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. निर्भया प्रकरणी १८ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

सेंगरवर ‘या’ कलमाअंतर्गत कारवाई

सेंगरवर न्यायालायने पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम ३ व ४, भादंवि कलम १२० बी (गुन्हेगारी कट), ३६६ (अपहरण आणि महिलेवर विवाहासाठी दबाव टाकणे) ३७६ (दुष्कर्म) असे गुन्हे निश्चित केलेले आहेत. ४ जून २०१७ ला नोकरी देण्याच्या बहाण्याने सेंगरने सहकारी शशी सिंह हिच्यासोबत मिळून कट रचला आणि १६-१७ वर्षांच्या तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप फिवर पोटनिवडणुकीतही कायम…

News Desk

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

News Desk

शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण न केल्याने शेतकऱ्यांचा मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा 

News Desk