HW News Marathi
Covid-19

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

उत्तरप्रदेश | उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण सध्या विलगीकरणात असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. याआधी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. उत्तर प्रदेशात एकाच दिवशी २ बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे आणि प्रशासन आणखी सतर्क झालं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर मी करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पूर्णपणे पालन करत आहे”. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्हर्च्युअल माध्यमातून आपण सर्व कामं करत असल्याचं सांगितलं आहे. राज्यातील सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सामान्य स्थितीत सुरु असल्याचं सांगताना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं तसंच काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच | उपमुख्यमंत्री अजित पवार 

News Desk

पुण्याला पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर निघाले खराब, डीनची थेट पालकमंत्र्यांकडे तक्रार

News Desk