HW News Marathi
Covid-19

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

मुंबई | उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथे ४२ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. ओमायक्रॉन बाधित व्यक्ती दुबईतून आले असून त्यांची विमानतळावर त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. परंतु त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पण उस्मानाबादमध्ये बावी त्यांच्या गावी आल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर रिपोर्ट काढले. व्यक्तीची आरटीपीसीआर रिपोर्ट करण्यात आली. या रिपोर्टमध्ये सदरील व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी पुण्याला पाठवण्यात आले. या व्यक्तीच्या १६ वर्षीय मुलाला देखील ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

दरम्यान, त्या व्यक्तीसोबत ३ जणांना कोरोना बाधित सापडल्या आहेत. आणि त्यांचे जिनोम सिक्वेन्सींग रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळे बावी गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सध्या बाबी गावात कलम 144 लागू करण्‍यात आले असून संबंधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू आहेत .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

News Desk

नागपुरात लॉकडाऊन नाही मात्र कठोर निर्बंध लावणार – नितीन राऊत

News Desk

मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत पालिकेकडून सुधारित नियमावली जाहीर

News Desk