HW News Marathi
देश / विदेश

कमांडर अभिनंदन यांच्या मुक्ततेच्या निर्णयाचे अमेरिकेकडून कौतुक

नवी दिल्ली | ”भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका कारण्याबाबत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. भारत आणि पाक दरम्यान निर्माण झालेली परिस्थिती सुधारावी यासाठी दोन्ही देशांनी थेट चर्चा करायला हवी. तसेच पाकिस्तानने दहशतवादा विरोधात आपले वचन पाळावे”, असे अमेरिकेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज (१ मार्च) अखेर मुक्तता करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शताब्दी एक्स्प्रेसची बोगी जळून खाक,सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले 

News Desk

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

News Desk

पंतप्रधानांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सलग २ दिवस होणार चर्चा 

News Desk