HW News Marathi
Covid-19

भारत-अमेरिका ‘कोरोना’वर लस विकसित करणार !

मुंबई | अमेरिका आणि भारत एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसवरही लस या वर्षाच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यात देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1261514269822201856?s=20

ट्रम्प यांनी काल (१५ मे) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदी आपले चांगले मित्र आहेत. मी काही दिवसांपूर्वीच भारत दौरा केला आहे. तर भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय आहेत. तर अनेक लोक लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते उत्तम वैज्ञानिक आणि संशोधक आहेत.”

https://twitter.com/realDonaldTrump/status/1261368451555360774?s=20

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे, असे ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प ट्वीटमध्ये म्हणाले, “मला ही घोषणा करताना अभिमान होत आहे की, संयुक्त राष्ट्र भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार आहे. या महामारी दरम्यान, आम्ही भारत आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही लस तयार करण्यासाठीही मदत करत आहोत. आम्ही मिळून अदृश्य शत्रूला हरवणार आहोत.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद, तर ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड

News Desk

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासात ३६०४ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

News Desk