HW News Marathi
Covid-19

घरातून बाहेर पडताना ओळखपत्र सोबत ठेवा – पोलिसांच्या नागरिकांना सूचना

मुंबई | कोरोनामुळे सध्या घरातून विनाकारण बाहेर पडण्यास मुंबई पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून देखील मनाई केली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून घराबाहेर पडणार असाल तर ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणि जर सूचनांचे पालन केले नाही तर पोलीस कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते, अशी सूचना देखील आता पोलिसांकडून नागरिकांना देण्यात आली आहे.

२ किलोमीटरच्या परिसरातच प्रवास करण्याची अट सरकारकडून नुकतीच मागे घेण्यात आली आहे. मात्र घरातून बाहेर सार्वजनिक ठिकाणी किंवा कामासाठी प्रवास करताना आता ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मुंबई शहरातील कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडाही वाढला आहे. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे महत्व जास्तच वाढणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दररोज नवीन नियम लागू केले जात असताना, आता प्रशासनाकडून या नव्या नियमाचीही अमंलबजावणी केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk

मानलं राव! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिवीर उत्पादनाचा परवाना

News Desk

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, एकूण संख्या २ हजार ५७४ वर

News Desk