HW News Marathi
देश / विदेश

दोन्ही देशांची तयारी असेल तरच मध्यस्थी | डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘दोन्ही देशांची तयारी असेल तरच मध्यस्थी’ करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलतना म्हणाले.

यापूर्वी काही दिवसांपूर्वी बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जी ७ संमेलनात भेट झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट सांगितले, “भारत आणि पाक यांच्यातील मुद्दा द्विपक्षीय आहे. त्यावर तिसऱ्या देशाने कोणतीही भूमिका घेण्याची आवश्यकता नाही, असे विधान केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जुलै महिन्यात अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी, ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी चर्चा झाली होती. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले. इतकेच नव्हे, तर ट्रम्प यांनी भारताचे मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नी चर्चा केल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर देशात राजकीय वदळ उठले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे शेतकरी बांधवांना आवाहन….

News Desk

अर्णब गोस्वामींच्या ‘त्या’ वर्तणुकीनंतर मला शरद पवारांनी फोन केला अन्…!

News Desk

रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल पीयूष गोयल यांनी केली महत्त्वाची घोषणा

News Desk