वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येणार आहेत.२४-२५ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहितीव्हाइट हाऊसने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. अमेरिका आणि भारताची सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ट्रम्प हा दौरा करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच भारतीयांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न या वेळी ट्रम्प करणार असल्याचीही चर्चा आहे.
President @realDonaldTrump & @FLOTUS will travel to India from February 24-25 to visit Prime Minister @narendramodi!
The trip will further strengthen the U.S.-India strategic partnership & highlight the strong & enduring bonds between the American & Indian people. 🇺🇸 🇮🇳
— The White House 45 Archived (@WhiteHouse45) February 10, 2020
परराष्ट्र मंत्रालयाने १६ जानेवारीला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी भारत आणि अमेरिका मुत्सद्दी माध्यमातून संपर्कात आहेत अशी माहिती दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी, मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी ट्रम्प यांना भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. दोन्ही देश याबाबत एकमेकांच्या संपर्कात आहेत. जेव्हा आम्हाला खात्रीशीर माहिती मिळेल, तेव्हाच ती सार्वजनिक केली जाईल, असेही रवीशकुमारांनी त्यावेळी सांगितले होते.
२०१९ च्या सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमधल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमादरम्यान मोदींनी ट्रम्प यांना भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या स्वप्नांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वासही त्यावेळी पंतप्रधानांनी मांडला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे याची वाट पाहणेच योग्य आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.