HW News Marathi
देश / विदेश

डिझेल पुन्हा ९ पैशांनी महागले

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सामान्य जनतेला आज थोडासा दिलासा मिळाला आहे परंतु डिझेलच्या दरात वाढ होण्याची मालिका सुरूच आहे. डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 88.18 प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत, तर डिझेलचे प्रतिलिटर 79.11 रुपये एवढे आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 82.72 आणि डिझेल 75.46पैसे प्रति लिटर असे दर आहेत.

गत आठवड्यात केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी करात कपात करत पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी केले होते. परंतु, ग्राहकांना याचा आंनद जास्त काळ घेता आला नव्हता. कारण कर कपातीनंतरही इंधन दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही कर कपात ग्राहकांना अल्प आनंद देणारी ठरली आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच्या पेट्रोल-डिझेलचे दर

तारीख पेट्रोल प्रतिलिटर डिझेल प्रतिलिटर

10/15/2018 88.18 रुपये 79.11 रुपये

10/14/2018 88.18 रुपये 79.02 रुपये

10/13/2018 88.12 रुपये 78.82 रुपये

10/12/2018 87.94 रुपये 78.51 रुपये

10/12/2018 87.82 रुपये 78.22 रुपये

10/10/2018 87.73 रुपये 77.93 रुपये

10/09/2018 87.73 रुपये 77.68 रुपये

इंधना सोबत भाजीपाल्यातही दरवाढ..

इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दरम्यानच्या काळात केंद्र व राज्य सरकारने इंधनाचे दर काही प्रमाणात कमी केले. परंतु, पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढउतार होत आहेत. मात्र त्याचा परिणाम राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Republic Day | मुंबईत रंगणार नौका नयन स्पर्धा

News Desk

भारत सरकारने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवली

News Desk

दोन्ही राजे केंद्र सरकारच्या मिठाला जगल्यासारखं बोलले ! शिवसेनेचा बोचरा टोला

News Desk