नवी दिल्ली | अमेरिकेने आता भारताला एक मोठा झटका दिला आहे. अमेरिकेने भारतासह तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (जीएसपी) तोडली असून भारताची विशेष व्यापारी सूट देखील रद्द केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (४ मार्च) सिनेटमध्ये दिली आहे. या निर्णयाची अधिसूचना जारी केल्यानंतर २ महिन्यांनी याची अंमलबजावणी होईल. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. अमेरिकेची व्यापार संधी योजना ही विशेषतः विकसनशील देशांसाठी होती.
United States Trade Representative: At direction of President Donald Trump, US Trade Representative Robert Lighthizer announced that US intends to terminate India’s & Turkey’s designations as Beneficiary Developing Countries under Generalized System of Preferences (GSP) program pic.twitter.com/cMWnnb3vGV
— ANI (@ANI) March 5, 2019
जीएसपी अंतर्गत ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. मात्र, आता ही सूट अमेरिकेकडून रद्द करण्यात आली आहे. अमेरिकेच्या विकसनशील देशांसाठी असलेल्या व्यापार संधीच्या योजनेचा भारताला सर्वाधिक लाभ होत होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती. “भारत आम्हाला मोटारसायकल पाठवितो तेव्हा आम्ही काहीच शुल्क आकारत नाही. परंतु, जेव्हा आम्ही भारतात मोटारसायकल पाठवितो तेव्हा त्यावर १०० टक्के शुल्क आकारले जाते. त्यामुळे हा शुल्क एकसमान असावा”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. ते व्हाइट हाउसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.