HW News Marathi
देश / विदेश

खनिज तेल खरेदीवरून अमेरिकेची भारताला इशारा वजा धमकी

नवी दिल्ली | जे देश व्हेनेझुएलाकडून खनिज तेल खरेदी करतील त्यांना लक्षात ठेवले जाईल, असा इशारावजा धमकी अमेरिकेकडून भारतासह अन्य देशांना देण्यात आली आहे. व्हेनेझुएला हा देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच व्हेनेझुएलाकडून भारताला अधिक प्रमाणात खनिज तेल विकण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

जे देश आणि कंपन्या राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्याकडून होत असलेल्या लुटीचे समर्थन करतील त्यांना लक्षात ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मंगळवारी (१२ फेब्रुवारी) ट्विट करून हा इशारा दिला आहे.

भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणारा व्हेनेझुएला हा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे. दरम्यान, याबाबत बोलताना बोल्टन म्हणले की, ”जो देश आणि कंपन्या व्हेनेझुएलामधील संपत्तीची लूट करत असलेल्या माडुरो यांना पाठिंबा देतील त्यांना आम्ही लक्षात ठेऊ”, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोरखपुरच्या त्या घटनेबाबत नोबल पुरस्कार विजेत्यांचीही नाराजी

News Desk

एस. ए. बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींची मंजुरी

News Desk

मोदींचा राहुल गांधींना फोन करुन तब्येतीची विचारपूस

News Desk