न्यूयॉर्क | जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनकडून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये मांडण्यात आला आहे. तसेच मसूदवर प्रवासबंदी, शस्त्रबंदी आणि संपत्ती जप्तीची कारवाई करण्याची मागणीही या देशांनी केली आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मांडण्यात आला.
US State dept to ANI:Cross-border terrorism,such as recent attack on India’s CRPF, poses grave threat to security of the area.We reiterate our call for Pakistan to abide by its United Nations Security Council commitments to deny terrorists safe haven & block their access to funds https://t.co/KBwf1k2z74
— ANI (@ANI) February 28, 2019
मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिमान सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स निर्बंध समितीत मांडू शकेल. या परिषदेत १५ सदस्यांची असून दर महिन्याला तिचे अध्यक्षपद एकेका देशाकडे दिले जाते. हे अध्यक्षपद एक्वाटोरियल ग्युनियाकडून एक मार्च रोजी फ्रान्सकडे जाणार आहे. सुरक्षा परिषदेचा फ्रान्स हा स्थायी सदस्य असून त्याला नकाराधिकार (व्हेटो) आहे.
Reuters: US, UK & France have asked the 15-member United Nations Security Council sanctions committee to subject Maulana Masood Azhar, the head of Pakistan-based militant group Jaish-e-Mohammad, to an arms embargo, global travel ban and asset freeze. https://t.co/lvQYJMI1BW
— ANI (@ANI) February 28, 2019
मसूद अझहर याच्यावर बंदी घातली जावी, अशा प्रस्तावावर फ्रान्स काम करीत असून, तो खूप लवकर तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आली आहे. तसा प्रस्तावही संयुक्त राष्ट्रात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.