HW Marathi
देश / विदेश राजकारण

उत्तर प्रदेशात देशातील सर्वात कमी वयाच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात सध्या कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात तासागणिक वाढत जाणारा कोरोनाबाधितांचा आकडा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र-राज्य सरकार दोघेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. देश एकूण २१ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन असताना वाढणारा आकडा चिंता वाढवत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये एका २५ वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशातील हा कोरोनाचा पहिला बळी आहे. संपूर्ण देशात आता कोरोनामुळे एकूण ३८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये हा तरुण सर्वात कमी वयाचा असल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशमधील या २५ वर्षीय तरुणाचे सोमवारी (३० मार्च) निधन झाल्याची माहिती मिळते. दरम्यान, त्यानंतर त्याचे सॅम्पल्स लखनौ येथील केजीएम रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. ते सॅम्पल्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते. त्यानंतर संबंधित मृत तरुणाच्या संपर्कात आलेले सर्व डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आता सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचप्रमाणे, अद्यापही हा मृत व्यक्ती आणखी कोणाकोणाच्या संपर्कात होता याचा तपासही प्रशासनाकडून घेतला जात आहे. तर दुसरीकडे गोरखपूरमधील बीआरडी रुग्णालयाला देखील हायअलर्ट देण्यात आला आहे.

Related posts

पवारांनी घराबाहेर पडू नये, सहपोलीस आयुक्तांनी घेतली भेट

News Desk

#LokSabhaElections2019 : विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचा भाजपचा निर्णय

News Desk

INX Media Case : पी. चिदंबरम सीबीआय न्यायालयात हजर, ५ दिवसांच्या कोठडीची मागणी

News Desk