उत्तरप्रदेश | काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर अत्याचार झाला तिच्या कुटुंबियांच्या भेटीला रवाना झाले असता त्यांना वाटेत उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले आणि अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
याआदी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी एखादेच चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले असं राहुल गांधींनी सांगितले आहे.
#WATCH Just now police pushed me, lathicharged me and threw me to the ground. I want to ask, can only Modi Ji walk in this country? Can't a normal person walk? Our vehicle was stopped, so we started walking: Congress leader Rahul Gandhi at Yamuna Expressway,on his way to #Hathras pic.twitter.com/nhu2iJ78y8
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 1, 2020
राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का ? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का ? आमचं वाहन थांबवण्यात आलं म्हणूनच चालत निघालो होतो”. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे.
ये लड़ाई न्याय की है, भाजपाई गोली- लाठी से नहीं रुकेगी।
ये लड़ाई देश बेटियों के लिए है, अहंकारी भाजपा के धक्कों से नहीं रुकेगी।कांग्रेस का इतिहास न्याय के लिए सीने पर लाठी-गोली झेलने का रहा है। गर्व है कि श्री @RahulGandhi उस परम्परा को निभा रहे हैं।#JusticeForIndiasDaughters pic.twitter.com/Q9BcUcxTOv
— Congress (@INCIndia) October 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.