उत्तर प्रदेश | देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावण्याचा पर्याय निवडला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केला असून यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. मात्र उत्तर प्रदेशात लॉकडाऊन असतानाही नियमांचं उल्लंघन करत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी करण्यात आल्याचा प्रकार समोर आली आहे.
Huge crowd in Uttar Pradesh's Badaun for religious leader's funeral amid #Covid19
Remember similar congregation in Rajasthan’s Barmer on the death of father of a cabinet minister?
Is this how we want to defeat #COVIDSecondWaveInIndia pic.twitter.com/ZKuUeMXJ4T— प्रो. राकेश गोस्वामी / Prof. Rakesh Goswami (@DrRakeshGoswami) May 11, 2021
मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाउन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अत्यंदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाउनचं उल्लंघन करत मशिदीत पोहोचले होते. मशिदीच्या बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
“बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कलेा आहे. १८८ तसंच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला असून अंत्यसंस्कारासाठी फक्त २० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.