HW News Marathi
देश / विदेश

लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही – ट्रेडोस

मुंबई | लस स्वतः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं खळबळजनक विधान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी केलं आहे. गेल्या काही महिन्यांत जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून या विषाणूने ५४ दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे. तर सुमारे १.३ दशलक्ष लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणून काम करेल. मात्र, त्यांची जागा घेऊ शकणार नाही. केवळ लस ही स्वतः ही महामारी संपवू शकत नाही. विषाणूचे अस्तित्व येत्या काळातही कायम राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या चाचण्या होणं, त्यांना क्वारंटाइन करणं, ट्रेसिंग आणि फिजिकल डिस्टंसिंग पाळणं आवश्यक असणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ६,६०,९०५ करोनाची प्रकरणांची संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीकडे नोंद झाली आहे. हा एक नवा विक्रमच आहे. हा आकडा आणि शुक्रवारी नोंद झालेल्या ६,४५,४१० या आकडेवारीनं ७ नोव्हेंबर रोजी नोंद झालेल्या एका दिवसाची ६,१४,०१३ आकडेवारी पार केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील १२ पोलीस झाले दहशतवादयांना सामील

News Desk

चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले जाणार नाही

News Desk

खुशखबर ! जिओ ग्राहकांना मिळणार ४के एलडी टीव्हीसह ४के सेट टॉप बॉक्स

News Desk