HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील १२ पोलीस झाले दहशतवादयांना सामील

श्रीनगर | देशाचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना एकीकडे दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत असताना आता दुसरीकडे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या ३ वर्षात जम्मू-काश्मीरमधील तब्बल १२ पोलिस कर्मचारी ३० शस्त्रे घेऊन पळून गेले असून दहशतवाद्यांना सामील झाले आहेत. या शस्त्रांमध्ये एके-४७ रायफल्सचा समावेश आहे. या सर्व प्रकारामुळे सुरक्षा दल आणि सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

हल्लीच विशेष पोलीस आदिल बशीर हा पोलीस खात्यातून पसार झाला होता. बशीर हा दक्षिण काश्मीरमधील वाची विधानसभा क्षेत्रातील पीडीपी आमदार इजाज मीर यांच्या अधिकृत निवासस्थानातून आठ हत्यारे घेऊन पळाला होता. त्याने पळवलेल्या हत्यारांमध्ये सात एके 47 आणि एका पिस्तुलाचा समावेश होता. बीएसएफ जवान शकीर वानीला (२९) राज्य पोलिस दलाकडून ५ ऑक्टोबरला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

वानी मुजाहिदीनच्या भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करायचा, दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे काम अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती करण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते, असा दावाही पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या अंतर्गत अहवालात ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल रशीद शिगन हा हिजबुलचा सक्रीय सदस्य होता. पोलिसांची नोकरी करताना रशीद शिगन याचा गेल्या १८ महिन्यात किमान १३ दहशतवादी हल्ल्यांमध्ये समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपिता महात्मा गाधींची आज १५० वी जयंती

News Desk

Union Budget 2021 | या ‘४’ राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा!

News Desk

दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहिती नाही !

News Desk