HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

नवी दिल्ली | ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काल रात्री कुलदीप नय्यर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते. तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.

आज दुपारी १ वाजता दिल्लीतील लोधी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निर्भीड, निपक्षपाती पत्रकार म्हणून त्यांची देशभरात ओळख आहे. पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. पत्रकार कुलदीप नायर यांचा जन्म १९२३ साली झाला. स्वातंत्र्य काळातील पत्रकारिता त्यांनी केली. सर्वप्रथम त्यांनी उर्दू भाषेतून पत्रकारितेस सुरुवात केली, त्यांनतर ते इंग्रजी पत्रकारीतेकडे वळले. त्यांनी ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्रासाठी काम केलं.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचा कार्यकाळ त्यांनी जवळून पहिला. इंदिरा गांधींच्या महत्त्वाच्या निर्णयांंवर त्यांनी पुस्तकं लिहिली. १९७५ साली आणीबाणीच्या काळात त्यांना अटकही झाली होती. १९४७ ते २०१५ या काळात त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधींवर त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रचंड गाजली. भारताचे ब्रिटनमध्ये उच्चायुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रादेशिक भाषेतून न्यायालयाचे निकाल मिळावेत: राष्ट्रपती

News Desk

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

News Desk

एम. के. स्टॅलिन यांची डीएमकेच्या अध्यक्षपदी निवड

swarit