HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन

नवी दिल्ली | देशातील सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी आज (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. जेठमलानी देशातील सर्वोत्कृष्ट वकिलांपैकी एक असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे खटले लढले आहेत. जेठमलानी हे केंद्रीय कायदेमंत्री देखली होते. त्याशिवाय त्यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचेही अध्यक्षपद भूषविले आहे.

राम जेठमलानी यांच्यामागे पुत्र आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी आणि दोन मुलगी आहे. जेठमलानी यांची मुलगी राणी जेठमलानीचे यापूर्वीच निधन झाले. तर एक मुलगी सध्या अमेरिकेत राहते. जेठमलानी यांची तब्येत खालावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांच्या खटले लढवले होते. याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरू आणि सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BSNLचा ग्राहकांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा नवा प्लॅन

News Desk

#PulwamaAttack : आम्ही केंद्रासोबत, ही राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

इस्रोच्या ‘जीसॅट-7 ए’ या संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

News Desk