नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि चिंता आणखी वाढत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज (११ ऑगस्ट) पंतप्रधान मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत केली. यावेळी प्रत्येक राज्यात कोरोनाची स्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यात आला या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आपली मते व्यक्त केली. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
व्हिडिओ कॉन्फरन्समधील महत्वाचे मुद्दे –
– कोरोनाचे रुग्ण अधिक तिथे चाचण्या अधिक करणे गरजेचे आहे.
– कोरोनावर मात करण्यासाठी ७२ तासांमध्ये कॉन्ट्रटॅक्ट ट्रेसिंग गरजेचे आहे.
– नागरिक, आरोग्य यंत्रणा यांच्या अनुभवाच्या ताकदीवर देश कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकणार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
We have seen that in some districts of UP, Haryana & Delhi, there was a phase when #COVID19 became a huge problem. Then we held a review meeting & a committee was formed under the chairmanship of Amit Shah and to a great extent, we achieved the results that we wanted: PM pic.twitter.com/iClRou8OPN
— ANI (@ANI) August 11, 2020
– कोरोनाच्या बाबतीत नागरिकांचा आत्मविश्वास वाढला, भीतीत घट झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले.
– १ टक्क्यांहूनही मृत्यूदर कमी आणण्यावर भर असणार आहे. तसेच रिकव्हरी रेट वाढवण्यावर भर देणे गरजेचे.
टेस्टिंग की संख्या बढ़कर हर दिन 7 लाख तक पहुंच चुकी है और लगातार बढ़ भी रही है। इससे संक्रमण को पहचानने और रोकने में जो मदद मिल रही है, आज हम देख रहे हैं। हमारे यहां औसत मृत्यु दर पहले भी दुनिया के मुक़ाबले काफी कम थी, संतोष की बात है कि ये लगातार और कम हो रही है: प्रधानमंत्री pic.twitter.com/CzKyc2kzl5
— ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2020
– कोरोनाच्या बाबतीत देशात दररोज ७ लाख चाचण्या केल्या जात आहेत. देशाचा रिकव्हरी रेटही वाढत आहे.
#WATCH We have seen that in some districts of UP, Haryana & Delhi, there was a phase when #COVID19 became a huge problem. Then we held a review meeting & a committee was formed under the chairmanship of Amit Shah and to a great extent, we achieved the results that we wanted: PM pic.twitter.com/bH4vBhUKGa
— ANI (@ANI) August 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.