HW News Marathi
देश / विदेश

मल्ल्याची परदेशातील १० हजार कोटीची संपत्ती जप्त

लंडन | भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या व्यावसायिक विजय मल्ल्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भारतीय बँकांनी लंडनच्या कोर्टात मल्लाया विरोधात याचिका दाखल केली होती. इंग्लंडच्या कोर्टाने भारतीय बँकांच्या बाजून निर्णय दिला. त्यानंतर मल्ल्याची जगभरातील संपत्ती गोठवण्याचा आदेश कोर्टाने कायम ठेवला आहे.

मल्लायाला १.५५ बिलियन डॉलर म्हणजे १० हजार ४३२ कोटी रुपयांचा खटला हरला आहे. त्याचप्रमाणे मल्ल्याकडून १० हजार कोटींची वसुली करण्यास बँकांना कोर्टाने परवानगी दिली आहे. भारतातील विविध बँकांकडून घेतलेल्या ९१०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न करता परदेशात पलायन केले होते. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार इंग्लंड किंवा वेल्समधील कोणत्याही संपत्तीची विक्री किंवा ट्रान्सफर मल्ल्याला करता येणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी केली पीएम-श्री योजनेची घोषणा

Manasi Devkar

लेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरने मागितली माफी

News Desk

राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये, उत्तर प्रदेश पोलिसांनी ५ जणांना घेतलं ताब्यात

News Desk