HW News Marathi
देश / विदेश

श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही- पंतप्रधान

नवी दिल्ली – हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथेधार्मिक श्रद्धांच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून कट्टरतावाद्यांना खडसावले. देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज राजधानी दिल्लीत आयोजित दिमाखदार सोहळ्यात मोदी बोलत होते.

विकासाच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी आपण सर्व एकत्रितरित्या काम करूया. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटलव्यवहार ३४ टक्के वाढले आहेत. विकासाचा वेग कायम राखून देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी या वेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्तमंगळवारी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांनी संबोधित केले. त्यांनी देशवासिायंनास्वातंत्र्यदिनाच्या कोटी-कोटी शुभेच्छा दिल्या. ‘संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असे भावोद्गारहीमोदींनी या वेळी काढले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने एकदा ठरवलं की भारत ते करुनच दाखवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

News Desk

मानहानी प्रकरण: राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार

Aprna

वाराणसीतील मॉलमध्ये गोळीबार

Gauri Tilekar