HW News Marathi
देश / विदेश

राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत भेट

नवी दिल्ली | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. येत्या 29 मार्च रोजी देशभरातील शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी राजू शेट्टींनी राहुल गांधींची भेट घेतली.

त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत असणारे राजू शेट्टी 2019 च्या निवडणुकीला यूपीएसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वेळी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हेदेखील उपस्थित होते. राजू शेट्टी यांनी यापूर्वीच एनडीए मधून बाहेर पडण्याच घोषणा केलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या वर्षी भारताचा विकासाचा दर 7.8% राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

News Desk

ऑपरेशन ऑल आउट दरम्यान काश्मीरमध्ये गोळीबार

News Desk

भारताच्या पोरी लय भारी, हरमनप्रीत खेळली सेहवाग सारखी

News Desk