HW News Marathi
देश / विदेश

वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे – पंतप्रधान

नवी दिल्ली | वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.

गावातील संसाधनांवर विश्वास ठेऊन व्होकल फॉर लोकलवर भर द्यायचा आहे. गावातील लोक दूरदूर कामासाठी बाहेर जातात. मात्र त्यांना आता गावाकडे परतावं लागलं आहे. गावाकडून शहरात कामासाठी येणाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी आम्ही एक मोठी योजना बनवली आहे. त्यामुळे गावाकडून कामाला येणाऱ्यांना सुविधा मिळेल.

कोरोनाच्या संकटातही कोट्यावधी गरिबांना मोफत गॅस मिळाला. 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य पोहचवण्यात आलं. 90 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये गरिबांच्या खात्यात पोहचले. कुणाला विश्वासही नव्हता की दिल्लीतील १०० रुपयांपैकी १०० रुपये गावांपर्यंत पोहचतील.नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पाची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी ११० लाख कोटी पेक्षा अधिक खर्च केला जाईल. यासाठी विविध क्षेत्रात जवळपास ७ हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. या संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवरकाम केल्याने सर्वच घटकांना फायदा होणार आहे.

कुणालाच वाटलं नव्हतं लाखो गरिबांच्या खात्यात कोट्यावधी रुपये हस्तातरित होतील, कुणालाच वाटलं नव्हतं शेतकरी, व्यापार, अंतराळ क्षेत्र यात आमुलाग्र बदल होतील. ते झालंय. भारतातील बदलाच्या या काळाला जग बारकाईने पाहतंय. त्यामुळेच परदेशी गुंतवणुकीने मागीलवर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. मागीलवर्षी एफडीआयमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळातही जगभरातील कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. हे असंच झालेलं नाही. यासाठी भारताने अनेक आमुलाग्र बदल केले आहेत.

फक्त आयातीवर बंदी घालणं आपला उद्देश नाही. निर्यातक्षमही व्हायचं आहे. भारतात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायला हवं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतराची सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार

Aprna

निवडणूक आयोग हा दात नसलेला वाघ 

News Desk

“तुमची लेकरं परदेशात शाळेत अन आमची कायम ऊसाच्या फडात”, पंकजा मुंडेंची पोस्ट व्हायरल

News Desk