HW Marathi
देश / विदेश

फॉक्सवॅगनमुळे देशाच्या पर्यावरणाचे नुकसान, ठोठावला ५०० कोटींचा दंड

नवी दिल्ली | राष्ट्रीय हरित अधिकारणाने फॉक्सवॅगन कंपनीला तब्बल ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फॉक्सवॅगनने त्यांच्या डिझेल कारमध्ये उत्सर्जनाचे प्रमाण कमी दाखवणारे, लपविणारे उपकरण बसवून देशातील पर्यावरणाचे नुकसान केल्याने राष्ट्रीय हरित अधिकारणाने फॉक्सवॅगन कंपनीवर ही कारवाई केली असून पुढच्या २ महिन्यात हा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय हरित अधिकारणाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने फॉक्सवॅगन कंपनीला हा दंड ठोठावला आहे.

“फॉक्सवॅगनने त्यांच्या डिझेल कारमधे उत्सर्जनाची प्रमाण कमी दाखविणारे उपकरण लावून पर्यावरणाचे नुकसान केल्याने राष्ट्रीय हरित अधिकारणाने फॉक्सवॅगनला १०० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता”, अशी माहिती नोव्हेंबरला २०१८ रोजी देण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय हरित अधिकारणाने फॉक्सवॅगन कंपनीला ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. येत्या २ महिन्यांमध्ये फॉक्सवॅगनला हा दंड भरावा लागणार आहे.

Related posts

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar

आमचा अंत पाहू नका, इराणचा देखील पाकिस्तानला इशारा

News Desk

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

Gauri Tilekar