मुंबई | कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिवाची पर्वा न करता आहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार आणि माध्यमांचे प्रतिनिधींना तिन्ही सैन्य दलाकडून आज (३ मे) मानवंदना देण्यास सुरुवात केली आहे. तिन्ही दलांच्या जवानांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिली. इंडियन एअर फोर्सतर्फे फ्लाय पास्टचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येणार आहे.
#WATCH IAF chopper showers flower petals on the Police War Memorial in order to express to pay tribute to police officials for their contribution in the fight against COVID19 pandemic#Delhi pic.twitter.com/XmKDBOAtfJ
— ANI (@ANI) May 3, 2020
हवाई दलाकडून वाहतूक आणि लढाऊ विमानमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर आकाशातून पृष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीमधील पोलीस मेमोरियलमध्ये आज सकाळी १० वाजता श्रद्धांजली अर्पण करून तिन्ही सैन्य दलाकडून पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात केली. यानंतर हवाई दल देशभरात फ्लाय पास्ट केले. हवाई दलाने पहिली श्रीनगर ते त्रिवेंद्र अशी आह. तर दुसरी फ्लाय पास्ट डिब्रुगढ ते कच्छ अशी आहे.
#WATCH Indian Air Force's flypast over Srinagar's Dal Lake to pay tribute to medical professionals and all other frontline workers. #COVID19 pic.twitter.com/enk7mwznJc
— ANI (@ANI) May 3, 2020
देशातील ‘या ‘ठिकाणी होणार पृष्पवृष्टी
दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊमध्ये लढाऊ विमाने फ्लाय पास्ट करतील. तर श्रीनगर, चंडीगढ, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोईम्बतूर आणि तिरुअनंतपुरममध्ये हवाई दलाची वाहतूक विमाने फ्लाय पास्ट करणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.