HW News Marathi
Covid-19

राज्यात आज 56 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची वाढ

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य शासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (8 एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 56 हजार 286 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 55 हजारांच्या पार गेला आहे. राज्य सरकारसाठी निश्चितच ही मोठी चिंतेची बाब आहे.

आज जारी झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 36 हजार 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 26 लाख 49 हजार 757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात एकूण 5 लाख 21 हजार 317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५ लाखांच्या पार

News Desk

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

फडणवीसांनी जर माझं ऐकलं असतं तर आज …! मुख्यमंत्रीपदावरून आठवलेंनी ऐकवले

News Desk