मुंबई | पूर्व लडाखच्या गालवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३ जुलै) लेह लडाख दौरा केला. तसेच, सैन्य, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विस्तारवादाचे युग संपले आहे आणि विकासाचे नवीन युग सुरू झाले आहे. “विस्तारवादाचे युग संपले आहे, हे विकासाचे युग आहे. इतिहास साक्षीदार आहे की विस्तारवादी शक्ती गमावली आहेत किंवा परत जाण्यास भाग पाडले गेले आहे,” असे निमो येथील सैनिकांना संबोधित करताना मोदी म्हणाले. मात्र पंतप्रधानांनी सैनिकांना संबोधित करताना चीनचा मुळीच उल्लेख केला नाही.
पीएम मोदी यांनीही गलवान व्हॅली संघर्षात जखमी सैनिकांची भेट घेतली आणि सांगितले की त्यांच्या शौर्याने युवकांना प्रेरणा मिळेल. ते म्हणाले, “तुमची बहादुरी, तुमचे रक्त तुम्ही पिढ्यान्पिढ्या तरूणांना आणि देशवासियांना प्रेरणा देईल,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जवानांसाठी असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. मात्र, यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या. दिखावा करण्यासाठी हे रुग्णालय उभे केले गेले अशा प्रतिक्रिया यायला लागल्या, असे वृत्त फ्री प्रेसजर्नल या वृत्तपत्रात दिले आहे.
“सैन्याने मोदींना सांगावे की हे त्यांच्या मार्केटींगच्या चालींचा भाग होणार नाही. ही मर्यादा आहे, कॉन्फरन्स रूमला फोटो बदलणे योग्य नाही,” असे एका ट्विटमध्ये लिहिले आहे. “पंतप्रधानांच्या कार्यालयाने हॉस्पिटलचे वॉर्ड आयोजित करण्यास सांगितले होते. आणि आमच्या पंतप्रधानांना एक चांगला फोटो मिळाला पाहिजे?” असे आणखी एका ट्विटमध्ये लिहिले आहे.
https://twitter.com/ashoswai/status/1279087895241019392?s=19
माजी लष्करी आरक्षक आणि न्यायालयीन वकील नवदीप सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, गेल्या महिन्यात जेव्हा स्टाफ ऑफ चीफ एम. एम. नारावाने यांनी याच ठिकाणी भेट दिली होती, तेव्हा असेच एक चित्र दिसत होते.
ते म्हणाले की ही एक सेमिनार रूम आहे जी मानसिक आरोग्यासाठी रूपांतरित केली आहे. इथे किरकोळ जखमी झालेल्या जवानांन ठेवण्यात येते. काही काळ त्यांना सैन्यापासून दूर ठेवले जाते जेणेकरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. इथे शारारिक पेक्षा मानसिक स्वाथ्यासाठी सैनिकांना ठेवले जाते.
The injuries could be minor but soldiers are kept in a relaxed & congenial environment, away from fellow patients & troops, for recuperation & debriefing purposes, after every such incident, not only for physical purposes but mental well being & security.https://t.co/UhtHNm3Eez
— Navdeep Singh (@SinghNavdeep) July 4, 2020
तर काही जणांनी असे देखील म्हटले आहे की आम्ही रुग्णालयातील एकही साधने नसणारे आणि नर्स देखील नसणारे रुग्णालय पहिल्यांदा पहिले आहे. तसेच काही नेटकऱ्यानी असेही म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सी ओ एस यांनी भेट दिलेले हेच रुग्णालय आहेत ज्यात जवान दिसत आहेत त्यामुळे हे खोटे रुग्णालय नसून खरे आहे असे म्हणत मोदींच्या या भेटीला पाठिंबा दिला आहे.
I have never seen a hospital only with beds without a single medical equipment, no doctors, no nurses not even a medical trash bins..
Is this a hospital or a conference room…?#MunnaBhaiMBBS pic.twitter.com/DZrteTvrW5— Sana sherien (@sanasherien) July 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.