नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राकडून कडक कारवाईला सुरुवात झाली आहे. केंद्राने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या विरोधात कारवाई करत काश्मीरमधील ५ फुटीरतावादी नेत्यांना असलेले संरक्षण काढून टाकले आहे. यावर बोलताना “आम्हाला सुरक्षेची गरजच नव्हती, त्यामुळे सुरक्षा काढून घेतल्याने काही फरक पडणार नाही”, असे अब्दुल गनी बट्ट यांनी म्हटले आहे.
Srinagar: Visuals from outside Separatist Abdul Ghani Bhat's office&residence after J&K admin withdraws security, Bhat says, 'Security was provided by state govt, I don't need it. My security is Kashmiri ppl. There are chances of war b/w Pak&India.Let them address war issue first pic.twitter.com/uiK5W5sknh
— ANI (@ANI) February 17, 2019
मीरवाइझ उमर फारुख, अब्दुल गनी बट्ट, बिलाल लोनस हाशमी कुरैशी आणि शब्बीर शाह या फुटीरवाद्यांचा यात समावेश आहे. आज संध्याकाळपर्यंत या फुटीरतावादी नेत्यांचे सर्व संरक्षण आणि सरकारी सुविधा काढून टाकण्यात येतील. त्याचप्रमाणे यानंतर कुठल्याही फुटीरतावादी नेत्याला सरकारी खर्चाने संरक्षण देण्यात येणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या या फुटीरवादी नेत्यांच्या संरक्षणावर सरकार तब्बल ७ कोटी रुपये खर्च करीत आहे. “राज्य सरकारने आम्हाला सुरक्षा पुरविली होती. या सुरक्षेची आम्हाला गरज नव्हती. काश्मीरी जनताच आमची सुरक्षा आहे. आधी पाकिस्तान आणि भारताने त्यांच्या युद्धाचा प्रश्न सोडवावा”, असे अब्दुल गनी बट्ट याने एएनआयला या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.