बंगळुरू | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे देशातील विविध राज्यात स्थलांतरित मंजूर आणि श्रमिक अकडून पडले आहे. या सर्व श्रमिक आणि मजुरांना आपापल्या राज्यात पोहचवणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे व्यवस्था करण्यात आली. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी श्रमिक विशेष रेल्वेमधून श्रमिक आणि मंजुरांना पाठवणार नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. येडियुरप्पा यांनी काल (५ मे) बैठकीत बांधकाम व्यवासायिक आणि इतर औद्योगिक कामांना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
A package of Rs. 1610 crores will be released as #COVID19 financial package. One time compensation of Rs 5000 will be given to 230,000 barbers and 775,000 drivers: Karnataka Chief Minister BS Yeddyurappa. #CoronavirusLockdown https://t.co/tuiJK6ONIo
— ANI (@ANI) May 6, 2020
‘कर्नाटकमध्ये जवळापास १ लाख स्थलांतरित मजूंर असून या सर्वांना त्यांच्या गावी जाण्याठी ३५०० बस आणि रेल्वेची व्यवस्था केली होती. मात्र, मजुरांना आपल्या घरी न जाण्यासाठी समजावण्याचे निर्देश मंत्र्यांना देण्यात आले असून बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे स्थलांतरित मजूंर येथेच थांबा, असे आवाहन कर्नाटक मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी स्थलांतरित मंजुरांना केले आहे. तर श्रम विभागाचे सचिव कॅपन मणिवन्नन यांनी ‘आता लॉकडाऊन हटवल्यानंतरच मजूर आपली घरी जाऊ शकतील. आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेऊ’ असे ट्विट केले.
कर्नाटक सरकारने श्रमिक विशेष रेल्वे रद्द करण्याचा निर्णय काल रात्री उशीर कर्नाटकच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी नोडल अधिकारी एन मंजूनाथ प्रसाद यांनी राज्य सरकारकडून एक पत्र दक्षिण-पश्चिम रेल्वेला लिहिले. या पत्रात त्यांनी बुधवारपासून आज (६ एप्रिल) श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात येणार नसल्याचे म्हटले. या पत्र कर्नाटकातून दररोज पाच दिवस दोन रेल्वेची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. यात बिहारच्या दानापूरला जाणाऱ्या रेल्वेची मागणी केली होतीत, असे पत्रात कर्नाटक सरकारने लिहिले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.