HW News Marathi
देश / विदेश

“आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशाला भेट द्यायची होती”

नवी दिल्ली | अलिकडेच जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची जबाबदारी दोन इसमांनी स्वीकारली आहे. या हल्ला प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक शोध मोहीम सुरु केली आहे. चार जणांच्या एका व्हाट्सअप व्हिडीओत त्यांतील दोन जणांनी हातात तिरंगा घेऊन “आम्ही १७ ऑगस्ट रोजी शीख क्रांतिकारक कर्तार सिंग सारभा यांच्या घरासमोर शरण येऊ” असे देखील सांगितले आहे.

तसेच “खालिदवर हल्ला करून आम्ही देशाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भेटवस्तू देऊ इच्छित होतो” असेही त्यांनी सांगितले. त्यांची दोघांची नावे सर्वेश शाहपूर आणि नवीन दलाल अशी असून आम्ही स्वतः शरण येऊन परंतु पोलिसांनी इतर कोणाचा छळ करू नये अशी विनंती केली आहे.

जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर सोमवारी भारतीय संविधान समितीच्या बाहेर हल्ला केला होता. बुधवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात संबंधित खालिद आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदविण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेल किंमतीत सलग सहाव्या दिवशी घट

swarit

मुंबईत कोरोनाधितांच्या आकड्यात ‘कृत्रिम’ घट, फडणवीसांचा आरोप

News Desk

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

News Desk