HW News Marathi
देश / विदेश

महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका होते | मोदी

नवी दिल्ली | “सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका होते. महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय?, असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी उपस्थित केला आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

“आम्ही साडेतीन वर्षात सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे स्मारक मिशन मोडवर पूर्ण केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक हे देशातील अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे केंद्र होणार आहे. या स्मारकामार्फत आदीवासींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस असल्याचे यावेळी मोदींनी म्हटले आहे. “सरदार पटेल यांचा भव्य पुतळा देशाला समर्पित करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांकडून या पुतळ्याच्या निर्मितीला जनआंदोलनाचे स्वरुप दिले गेले आहे. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अवजारांमुळे पुतळ्यासाठी शेकडो टन लोखंड मिळाले,” असा आवर्जून उल्लेखही यावेळी मोदींनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधार कार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी केंद्र सरकारने काढले ‘हे’ नवे आदेश; जाणून घ्या…!

Aprna

सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार; अमित शाहूची मोठी घोषणा

Chetan Kirdat

सिक्‍कीममधील घुसखोरीचा चीनी सैनिकांचा डाव, भारतीय जवानांनी उधळून लावला कट

News Desk