HW Marathi
देश / विदेश राजकारण

आम्ही कलम ३७१ ला हातही लावणार नाही, अमित शाहांचे आश्वासन

नवी दिल्ली | “काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर आता ईशान्य भारतातील राज्यांना विशेष घटनात्मक दर्जा देणारे कलम ३७१ देखील हटविले जाणार असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. मात्र, आम्ही कलम ३७१ ला हात देखील लावणार नाही”, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. अमित शाह रविवारी (८ सप्टेंबर) गुवाहाटीमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीत ईशान्य भारतातील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते.

“जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० हटविल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लोकशाही असलेल्या देशात टीका करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण, आता तर कलम ३७० प्रमाणेच कलम ३७१ देखील रद्द करण्यात येणार असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. येथील लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप देखील यावेळी अमित शाह यांनी केला आहे.

“काश्मीरच्या कलम ३७० आणि ईशान्य भारताच्या कलम ३७१ मध्ये मोठी तफावत आहे. कलम 370 हे तात्पुरते होते मात्र कलम ३७१ ही विशेष तरतूद आहे. मी संसदेत देखील हे स्पष्ट केले आहे आणि आता सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आश्वासन देतो की कलम ३७१ ला आम्ही हात देखील लावणार नाही. कलम ३७१ हटविले जाणार नाही”, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

Related posts

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk

कावेरी नदीवर कोणत्याही राज्याचा अधिकार नाही

Ramdas Pandewad

नेटीझन्सकडून भारतीय वायू सेनेचे अभिनंदन, सोशल मीडियावर ‘Air Strike’ ट्रेंडिंग

News Desk