नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरातून पाकिस्तानला लक्ष्य केले गेले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताला पाठिंबा दर्शविला जात आहे. भारताने दहशतवादविरोधी लढाईत इस्राईल युद्ध पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी होत होती. आता अखेर इस्राईलकडूनही भारताला संपूर्ण समर्थन दर्शविले आहे. “भारताच्या दहशतवादाविरोधी लढाईत आम्ही भारताला सर्व प्रकारची मदत करू”, असे इस्राईलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतातील इस्राईलचे राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी ही माहिती दिली आहे. “इस्राईलचे अध्यक्ष नेतान्याहू यांनी भारताला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही तुम्हाला दहशतवादाविरोधी लढाईत मदत करताना कोणतीही मर्यादा पाळणार नाही”, असेही इस्राईलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “आम्ही भारतासारख्या आमच्या सच्च्या आणि जवळच्या मित्राला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी पूर्णतः तयार आहोत. त्यामुळेच दहशतवादाविरोधात आम्ही आमच्या मित्राला इस्रायली युद्धतंत्र देऊ”, असेही माल्का यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.