HW News Marathi
देश / विदेश

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ नोटीसला अभ्यास करून उत्तर देणार !

नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा धक्का पचविण्यापूर्वीच आता राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा नोटीसा येत राहतात. आम्ही पाठपुरावा करून त्याचे उत्तर देऊ”, असे नवाब मलिक म्हणाले.

“२०१४ साली देखील अशाच प्रकारे नोटीस आली होती. आम्ही छोट्या-छोट्या राज्यांमध्ये निवडणुक लढवत असून आम्हांला बऱ्यापैकी मतदान होत आहे. आता विधानसभा निवडणूक देखील आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या या नोटिशीला कायद्याचा अभ्यास करून, पाठपुरावा करून उत्तर देऊ”, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने अनेक राजकीय पक्षांना त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यासंबंधीची नोटीस बजावली आहे. या राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुष्यभर काँग्रेस नेते गांधी कुटुंबियांची ‘गुलामीच’ करणार

News Desk

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलेला मिळणार पोटगी

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

News Desk