HW News Marathi
राजकारण

शिवाजी पार्कवर सभा घेण्यास ओवेसींना परवानगी मिळते, मग राहुल गांधींना का नाही ?

मुंबई | “मुंबई महापालिकेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यास परवानगी नाकारली. मात्र, उद्या (२३ फेब्रुवारी) प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. त्यांना परवानगी मिळते मग राहुल गांधींच्या सभेला परवानगी का मिळत नाही ?”, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

एमएमआरडीए मैदानावर राहुल गांधी यांची १ मार्चला संध्याकाळी ६ वाजता सभा होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि संजय निरुपम एमएमआरडीए मैदानाची पाहणी देखील केली आहे. दरम्यान, एमएमआरडीए आधी काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेसाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कची जागा मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली. शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्या उद्या होणाऱ्या सभेला मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संजय निरुपम यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज एकत्र सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार राणेंचा सहभाग

News Desk

‘बजेट’ मतांचेच असले तरी देशातील सगळय़ांसाठी दिलासादायक

News Desk