HW News Marathi
देश / विदेश

निपाह व्हायरस म्हणजे काय?

मुंबई | दक्षिण भारतात निपाह या व्हायरसने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात पसरलेल्या निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.

दरम्यान, सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी केरळला डॉक्टरांचे पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

आणखी २५ जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचे निष्पन्न झाले. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणे टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळे खाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावरुन राज्यभरात आरोग्य संस्थांना काळजी घेण्याचे आदेश केद्र सरकारने दिले आहे.

  • निपाह व्हायरस कसा पसरतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह व्हायरस (NiV) वेगाने पसरतो, जो मनुष्य आणि प्राण्यांमध्ये गंभीर आजाराला जन्म देतो. NiV च्या बाबतीत सर्वात अगोदर 1998 साली मलेशियातील कम्पंग सुगाई निपाह येथून माहिती मिळाली होती. तेव्हापासूनच या व्हायरसला हे नाव देण्यात आले. त्यावेळी डुकरांपासून हा आजार पसरला जात होता.

मात्र नंतर ज्या ज्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला, तिथे हा व्हायरस पसरण्यामागचे कोणतेही नेमके कारण आढळून आले नाही. बांगलादेशमध्येही २००४ साली काही लोकांना या व्हायरसची लागण झाली होती. बांगलादेशमधील या लोकांनी खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ खाल्ल्याचे समोर आले होते.

दरम्यान, या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची उदाहरणे भारतातही पाहायला मिळाली आहेत. NiV मुळे श्वसन प्रक्रियेसंबंधी गंभीर आजार होतो.

मनुष्य किंवा प्राण्यांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस तयार झालेली नाही.

  • आजाराची लक्षणे काय?

या आजाराची लक्षणे रुग्णाला २४ ते ४८ तासामध्ये कोमात पोहोचवतात. आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो, तर काही रुग्णांना न्यूरोलॉजिकल समस्याही (मज्जासंस्थेसंबंधी) होते.

१९९८-९९ सालामध्ये हा आजार पसरला तेव्हा जवळपास २६५ जणांना या आजाराची लागण झाली होती, असे बोलले जाते. रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जवळपास ४० टक्के रुग्णांना गंभीर आजार झाला होता, ज्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

सर्वसाधारणपणे वटवाघूळ, डुक्कर किंवा मनुष्यांद्वारे हा आजार पसरतो. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुक्करांच्या माध्यमातून हा आजार पसरल्याचे समजले होते, तर भारत आणि बांगलादेशमध्ये मनुष्यांपासूनच या आजाराचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे.

  • काय काळजी घ्याल?

या आजारापासून दूर राहण्यासाठी खजूर, खजूरच्या झाडापासून मिळणारा द्रव पदार्थ आणि झाडाखाली पडलेली फळे खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय डुक्कर, आजारी घोडे किंवा इतर जनावरांपासून दूर राहणेही गरजेचे आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्यांची साडी उतरविण्या

News Desk

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

News Desk

CBSE बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकेवरील सुनावणी 3 जूनपर्यंत टळली

News Desk