HW Marathi
देश / विदेश

पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी व्हॉटस्ॲप प्रयत्नशील

मुंबई | सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले व्हॉटस्ॲप मेसेंजर ॲप आता भारतीय यूजर्ससाठी पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी ‘व्हॉटस्‌ॲप’ गेल्या २ वर्षांपासून सरकारशी संपर्क साधत आहे. ‘व्हॉटस्‌ॲप’चे सीईओ क्रिस डॅनिअल यांनी आरबीआयला पत्र लिहून भारतातील सर्व यूजर्संना पेमेंट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) व्हॉटस्ॲपला पेमेंट सेवा देण्यासाठी परवानगी दिलेली नाही.

दरम्यान या पेमेंट सेवेद्वारे लोक मेसेजप्रमाणेच सुरक्षितरित्या आर्थिक व्यवहार करत आहेत, असा दावा व्हॉटस्ॲपने केला आहे. जगभरात ‘व्हॉटस्‌ॲप’चे तब्बल १०० कोटी यूजर्स आहेत. त्यातील २० कोटी भारतीय यूजर्स आहेत. भारतातील यूजर्सची वाढती संख्या लक्षात घेता व्हॉटस्ॲप पेमेंट सेवा देण्याच्या प्रयत्नात आहे.

व्हायरल होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांना रोखण्यासाठी ‘व्हॉटस्‌ॲप’चे सीईओ क्रिस डॅनिअल हे भारत दौऱ्यावर येऊन गेले होते. तसेच व्हॉटस्‌ॲप आता भारतात कॉर्पोरेट ऑफिस सुरू करणार आहे.
आता ‘व्हॉटस्‌ॲप’ने १० लाख यूजर्संसाठी या पेमेंट सेवेची चाचणी सुरू केली आहे. याबाबत लोकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक आहेत. मात्र, अद्याप त्याला अधिकृत परवानगी मिळालेली नाही.

Related posts

ऑनलाईन सट्टा कंपनीच्या संचालकाला सायबर पोलिसांकडून अटक

News Desk

भारतात मोमो चॅलेंजचा दुसरा बळी

Gauri Tilekar

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास उघड का करता येणार नाही ?

News Desk