HW News Marathi
देश / विदेश

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): न्यायाधीशांचे वेतन वाढवणे विसरलात का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्यानंतर नोकरशहांचे पगार न्यायाधीशांपेक्षा जास्त आहेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी आणि अधिकाºयांना‘धुलाई भत्ता’ देण्याबद्दलच्या एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायाधीश एस. अब्दुल नजीर आणि जे. चेलेश्वर यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी करताना सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांना न्यायाधीशांच्या वेतनाबद्दल प्रश्न विचारला. ‘सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील वेतनाबद्दल तुमचे काय विचार आहेत? सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाºयांच्या वेतनात ज्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या प्रमाणात न्यायाधीशांचे वेतन वाढलेले नाही,’ असे न्यायाधीश नजीर आणि चेलेश्वर यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit

न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान

Aprna

अनिल अंबानींकडून काँग्रेस, नॅशनल हेरॉल्डविरुद्धचा मानहानीचा खटला मागे

News Desk