जीनिव्हा | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा १०१ वर पोहोचला आहे. तसेच भारतात कोरोनाबाधितंचा आकडा हा ४०० च्या पुढे गेला आहे. भारताची लोकसंख्या ही कोटींच्या घरात आहे मात्र ज्या पद्धतीने भारत कोरोनी सामना करत आहे ही बाब खरंच कौतुकास्पद आहे. भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. भारतासारख्या देशांनी जगाला मार्ग दाखवला पाहिजे. अशा संकटांच्यावेळी प्रसंगी आक्रमक व्हावे लागते. सर्वसामान्यांपासून देशाच्या प्रमुखांपर्यंत सार्वजनिक आरोग्य राखणाऱ्या कृती या गंभीरपणे हाताळणे गरजेचे असते, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी प्रचंड क्षमता लागते ती कोरोनाच्या प्रसंगी भारताने दाखवला आहे. कांजण्या आणि पोलिओ निर्मूलनात भारताने जगाचे नेतृत्व केले; सार्वजनिक आरोग्यासह समाज पातळीवरही भारताने आक्रमक कृती करणे चालूच ठेवले आहे हे खरोखर महत्वाचे आहे, अशा शब्दांतही भारचाचे कौतुक केले गेले. कोरोनाविरोधी लढ्यात भारत सरकारची कामगिरी खूपच प्रभावशाली आहे. सरकार, नागरिक प्रत्येकजण एकत्र येऊन कोरोनाशी सामना करत आहे आणि त्यासाठी संघटित झाले आहेत, हे पाहून मी खूप प्रभावित झालो’ असे भारतातील WHO चे प्रतिनिधी हेन्क बिकेडम यांनी म्हटले होते.
दरम्यान, भारतात ३० राज्ये लॉक डाऊन करण्यात आली आहेत. ७२८ पैकी ६०६ जिल्ह्यांच्या सीमा हा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. राज्य आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यासाठी योग्य त्या जागांचीही सोय करण्यात येत आहे.
India led the world in eradicating 2 silent killers – small pox and polio; it is really important that India continues to take aggressive action at public health as well as society level: @WHO #Covid19India #StayHome#CoronaVirusUpdates pic.twitter.com/v65nrJM6AE
— DD News (@DDNewslive) March 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.